घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आयुक्तांची बैठक; संबंधितांना दिल्या सूचना

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं. ओल्या आणि कोरडा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. यासह इतर बाबींसाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. यात या बैठकीत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

आज मंगळवार, दि.२४ मे रोजी दुपारी ३ वाजता उपायुक्त/आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर सर्व सी.एस.आय., एस.आय.युनिट प्रमुख, मुकदम तसेच वॉटर ग्रेसचे सर्व सुपरवायझर यांची बैठक आयुक्त यांचे दालनात बैठक संपन्न झाली.

जळगाव शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील निघणारा ओला व कोरडा कचरा आपल्या परिसरात न टाकता तो घंटा गाडीतच टाकावा. अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. नागरिकांनी असे न केल्यास घनकचरा अधिनियमा अंतर्गत संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. व व अशा अशा नागरिकावर दंड आकारण्यात येईल. अशा सूचना आयुक्त यांनी या बैठकीत संबंधितांना दिल्या. याबाबत नागरिकांना आपल्या स्तरावर प्रबोधन करण्याच्या सूचनासुद्धा यावेळी बैठकीत देण्यात आल्या.

जळगाव शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील कचरा परिसरात न टाकता घंटागाडीतच टाकावा याबाबत नागरिकांना प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आवाहन केले.

Protected Content