लग्न समारंभातून दागिन्यांसह ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला तीन तासातच अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  लग्न समारंभात महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल लांबविणाऱ्या परप्रांतीय संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोदगाव चौफुलीवर मुद्देमालासह चाळीसगाव शहर पोलीसांना अटक करण्यात यश आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालवीर माखन सिसोदिया वय १९ रा. गुलखेडी ता पचोर जि. राजगड मध्यप्रदेश असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की,  चाळीसगाव शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यातील फिर्यादी यांचेकडेस नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन  हा मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पर्समधून चोरी केल्याची घटना गुरूवार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी परिसरातील आणि धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याच्या आधारे संशयित आरोपी बालवीर माखन सिसोदिया वय १९ रा. गुलखेडी ता पचोर जि. राजगड मध्यप्रदेश याला कोदगाव चौफुलीवर सापळा रचून मुद्देमालासह अवघ्या तीन तासात अटक केली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक  एम.राजकुमार पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि योगेश माळी, पोना दिपक पाटील, पोकॉ नंदु महाजन, पोकॉ अजय पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोहेकॉ नितीन वाल्हे यांनी ही कारवाई केली आहे. अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला अटक केल्याने लग्नातील  वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून गौरवण्यात आले. पुढील तपास  पोना दिपक पाटील हे करीत आहे.

 

Protected Content