‘गिरणा अ‍ॅग्रो’च्या नावावर दादा भुसेंचा कोट्यवधीचा घोटाळा : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दादा भुसे यांनी ‘गिरणा अ‍ॅग्रो’ कंपनीच्या नावावर कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल रात्री एक ट्विट करून दादा भुसे यांच्यावर आरोप केला. यानंतर आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या आरोपांचा पुनरूच्चार केला. याबाबत राऊत म्हणाले की, भुसे यांनी गिरणा ऍग्रो या नावाने कंपनी स्थापन करून सुमारे १७८ कोटी रूपयांचे शेअर्स जमा केले. कंपनीच्या संकेतस्थळावर मात्र १ कोटी ६७ लाख रूपयांचे शेअर्स दाखविण्यात आले आहेत. हा मोठा घोटाळा असून याचा लवकरच स्फोट होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

दादा भुसे यांचा बालेकिल्ला असणार्‍या मालेगावमध्ये उध्दव ठाकरे यांची २६ मार्च रोजी सभा होणार असून याआधी त्यांच्या सहकार्‍यांतर्फे भुसे यांना टार्गेट करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर संजय राऊत यांनी भुसेंंवर गंभीर आरोप केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content