यावल बसस्थानक जीर्ण : नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल हा आदिवासी  तालुका अशी जिल्ह्यात ओळख असून, असे असले तरी एसटी बस आगार हे उत्पन्नात जळगाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे.  तरी देखील जुनाट व अतिशय जिर्ण झालेले बसस्थानक हे उपेक्षीत असुन मागील पाच ते सहा वर्षापासुन प्रवासी या बसस्थानकाच्या नुतनीकरण कधी होणार याची वाट बघत आहे.

यावलचे एसटी बस आगार हे सुमारे पन्नास वर्षापेक्षा अधिक जुने आहे. या संपुर्ण बसस्थानकची इमारत जिर्ण झाली आहे . नाशिक विभागात व जळगाव जिल्हाात प्रवासी सेवा व उत्पन्नात नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या यावल आगाराच्या बसस्थानकाची अवस्था ही अत्यंत बिकट व दयानिय झाली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व बस स्थानकांच्या इमारतीचे नुतनीकरण झाले असून, यावलकडे मात्र लोकप्रतिनिधी , महामंडळाचे वरिष्ठांचे लक्ष का जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासांना पडला आहे.  विशेष म्हणते यावल तालुक्यातील फैजपुर शहरातील बसस्थानकाचे नुतनीकरण झाले तरी यावल बसस्थानकाचे का नाही ?  असा प्रश्न नागरीकांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्याचे मुख्य शहर असतांना ही  पन्नास वर्षापेक्षा ही अधिक दिर्घ काळातील बांधलेले यावलच्या स्थानकाच्या भिंती बांधकाम कोसळत आहे.  तरी देखील कुणी लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. या विषयाला घेवुन प्रवासांचे हित लक्षात घेता यावल तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी सातत्याने बसस्थानकाची इमारतीचे नुतनीकरण व्हावे याचा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. यावल आगाराला मागील तीन वर्षापासुन कायमस्वरूपी कार्य करणारे आगार व्यवस्थापक नसल्याने देखील अनेक समस्या निर्माण झाल्यात.  मात्र,  आता यावल आगारास दिलीप महाजन यांच्या रूपाने कायमस्वरूपी एक कार्यकुशल व अभ्यासु एसटी आगार व्यवस्थापक मिळाल्याने आगाराच्या प्रलंबीत जुनाट व जिर्ण झालेल्या नुतनीकरण इमारतीसह इतर प्रवासांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .

 

Protected Content