कोरपावलीत फोडले बंदघर : ७० हजाराचा ऐवज लंपास

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यांसह ७० हजाराचा ऐवज लंपास केला. दरम्यान, गावातील आणखी चार घरात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, कोरपावली तालुका यावल कोरपावली येथे रहिवासी असलेल्या सायराबी बिस्मिल्ला पटेल हे मागील दोन दिवसांपासुन आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्ताने जळगाव येथे नातेवाईकांच्या घरी गेल्या असतांना दि.७ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरांट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामानाच नासधूस करून कपाटातील ठेवलेल्या बॅगेतील मौल्यवान वस्तू पंधरा ग्रॅम सोन्याचे दागिने व १४ हजार ८०० रुपये रोख अशा सुमारे ७० हजार रूपयाचा ऐवज लंपास करून घरातील बॅग जवळ असलेल्या केळीच्या बागेत नेऊन  त्या ठिकाणी बॅगकडून तेथून पसार झाले.

कोरपावली गावाच्या बाजुस असलेल्या महेलखेडी गावात देखील एक आणी कोरपावली गावातील तिन घरांना चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे वृत्त असुन तर महेलखेडी गावात काही घराच्या आजु बाजू च्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरील कडी बंद करून महेलखेडीचे माजी सरपंच विलास भागवत पाटील, माजी पंचायत समिती सभापती शोभा विलास पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या दाराची कडी उचकुन घरात प्रवेश करण्याच्या बेतात असताना जवळीक घरातील व्यक्ती लघु शंके करीत दार उघडून बाहेर येण्याच्या प्रयत्नात असतांनाचे पाहुन अज्ञात चोरांनी त्या ठिकाणाहुन पळ काढला.

सदर घटनेची माहिती यावल पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार कोरपावली येथे घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक  विनोद खांडबहाले व त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पोलीस नाईक संजय देवरे,  घटनेची पाहणी करून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

 

Protected Content