नशिराबाद टोल नाक्याजवळ कंटेनरमधून चोरट्यांनी लांबवले पार्सल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार ८०० रुपये किंमतीचे पार्सल चोरुन नेल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव ते नशिराबाद दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर क्रमांक (एमएच ०१ एसी ०१५७) क्रमांकाचे कंटेनर १३ फेब्रुवारी रात्री १० ते १४ फेब्रुवारी रात्री २ दरम्यान महामार्गावरून भुसावळकडे जात हाते. कंटेनर नशिराबाद येथे आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंटेनरमध्ये असलेले स्टाँटन कंपनीचे १५ हजार ८०० रुपये किंमतीचे पार्सल कंटेनरमधून चोरून नेण्याचे कंटेनर चालकाच्या लक्षात आले.  याबाबत कंटेनर चालक रंजनकुमार लालदेव पासवान (वय-२८) रा. चंद्रहता पोस्ट केरप थाना -रफिगंज (बिहार) यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुरुवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भाग्यश्री चौधरी करीत आहे.

 

Protected Content