Home Uncategorized मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने युवकाचा मृत्यू

मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने युवकाचा मृत्यू

0
36


बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही  घटना शनिवारी सायंकाळी खामगाव  तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे घडली.

 

पिंप्री देशमुख शेत शिवारातील दिलीप भास्करराव देशमुख यांच्या शेतात सायंकाळी सोयाबीन मळणीचे काम सुरू होते. यासाठी रामेश्वर प्रल्हाद थोरात यांच्या मालकीच्या एमएच २८ एजे २१२५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मळणी यंत्राची जोडणी करण्यात आली. दरम्यान, या यंत्रात सोयाबीन लोटत असताना ज्ञानेश्वर दामोदर अढाव (२५) या युवकाचा हात ओढल्या गेल्याने त्याचे संपूर्ण शरीर मळणी यंत्रात अडकले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठल बाळकृष्ण अढाव (२७) यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत .

 


Protected Content

Play sound