कालिंकामाता मंदीर ते जुना खेडी रोड दरम्यानच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंकामाता मंदीर परिसर ते जुना खेडी रोड दरम्यानच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटीची घोषणा केली होती. या निधीपैकी मिळालेल्या ४२ कोटीच्या निधीतून शहरातील कालिंकामाता मंदीर परिसर ते जुना खेडी रोड या रस्त्याच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जळगाव शहराच्या विकासाचे ध्येय ठेवून मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची घोषणा केली होती. या निधीपैकी ४२ कोटींचा निधी महापालिकेचा प्राप्त झाला आहे. मिळालेल्या निधीतून कालिंकामाता मंदीर परिसर ते जुना खेडी रोड या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. तसेच जसा जसा निधी मिळेल तसे तसे शहरातील प्रत्येक रस्ता दुरूस्ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशी माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, नगरसेवक विरेन खडके, विजय वानखेडे, यांच्यासह परिसरातील स्थानिक रहिवाशी आदींची उपस्थिती होती.

Protected Content