गरीब पुजाऱ्याशी लग्न केल्यास ३ लाखाचा बॉन्ड मिळणार

 

 

बंगळुरू: वृत्तसंस्था । आर्थिक दुर्बल ब्राह्मण व्यक्तीशी लग्न करणाऱ्या ब्राह्मण महिलांना आता सरकारी मदतीच्या २ योजना कर्नाटक सरकारने जाही केल्या आहेत पहिल्या योजनेत गरीब पुजाऱ्याशी लग्न केल्यास ३ लाखाचा बॉन्ड मिळणार आहे

कर्नाटकात ब्राह्मणांच्या विकासासाठी दोन योजना प्रयोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहेत. मैत्रेयी आणि अरुंधती नावाच्या या दोन योजना असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. कर्नाटकात वर्षभरापूर्वी स्टेट ब्राह्मण डेव्हल्पमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली असून या बोर्डानेच या दोन्ही योजनांना मंजुरी दिली आहे.

पहिल्या स्किममध्ये 25 ब्राह्मण महिलांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचा फायनान्शिअल बॉन्ड देण्याची व्यवस्था आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलांना याचा फायदा मिळणार आहे. दुसऱ्या स्किमनुसार ५५० महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. आपल्याच समुदायातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील व्यक्तिशी लग्न करणाऱ्या महिलांना हा निधी दिला जाणार आहे.

ब्राह्मण समाजातील गरीबांच्या विकासासाठी या योजना लागू करण्यात आल्या आहेत. अरुंधती स्कीममध्ये महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि मैत्रेयी स्किममध्ये महिलांना ३ लाख रुपयांचा बॉन्ड दिला जाईल, असं कर्नाटक ब्राह्मण डेव्हल्पेंट बोर्डाचे चेअरमन आणि भाजप नेते एस. एस. सच्चिदानंद मूर्ती यांनी सांगितलं.

कर्नाटकची लोकसंख्या ६ कोटी आहे. त्यात ब्राह्मण ३ टक्के आहेत. या योजनांसाठी १४ कोटींचा वेगळा फंड ठेवण्यात आला आहे. या योजनांमुळे गरीब ब्राह्मणांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल. त्यांना स्कॉलरशीप, शुल्क, प्रशिक्षण आदींसाठी हा निधी खर्च केला जाईल. यूपीएससी सारख्या परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पैसा खर्च करण्यात येणार आहे, असल्याचं मूर्ती यांनी सांगितलं.

Protected Content