मोहराळा येथेही कोरोनाचा शिरकाव : शिबिरात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह

यावल, प्रतिनिधी । आतापर्यंत पाच महिने कोरोनाला अटकाव असलेल्या व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोहराळा गावात ०५ व्यवसायिक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम ( ता. यावल ) अंतर्गत मोहराळा येथे कोविड-19 साठी आरटीपीसीआर टेस्ट शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून २५ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यात ०५ व्यवसायिक पॉझिटिव मिळून आल्याने मोहराळे येथे कोरोना चा शिरकाव झाल्याचे दिसून आलेले आहे.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोविंड 19 चा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. रुग्ण सतत लक्षणे बदलत आहेत. रुग्णाला पहिल्या पायरीवर ओळखून , लवकर निदान होऊन तो वाचतो व लवकर अलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे १५ व्यक्ती तो संक्रमित होण्यापासून वाचवतो. त्यामुळे मृत्यू दर कमी करून तो रोखता यावा. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देशानुसार व तालुका . आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात संशयित रुग्ण , व्यवसायिक , खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण , प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या नियोजनाने प्रा. आ. केंद्र सावखेडासिम अंतर्गत गावात रॅपिड एंटीजन व आरटीपीसीआर टेस्ट साठी स्वॅब घेण्यात येत आहेत.मोहराळा येथील या पाच रुग्णांना फैजपूर येथील कोविंड केअर सेंटर येथे पाठवण्यात आलेले आहे.

स्वॅब आरोग्य सेवक अरविंद जाधव , कल्पेश पाटील यांनी घेतले त्यांना प्रवीण सराफ , राजेंद्र बारी , दिवाकर सुरवाडे व समीर तडवी यांनी मदत केली. शिबीर यशस्वीतेसाठी जुगरा तडवी, आशा सेविका निर्मला पाटील, योगिता पाटील, कल्पना पाटील यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच वासुदेव पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील यांनी गावात जनजागृती करून शिबिरात सहकार्य केले.

Protected Content