जोशीपेठेतील वृध्द महिलेचे घरफोडून ३० हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जोशी पेठेत राहणाऱ्या वृध्द महिलेल्या घरातून गुरूवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ३० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. शनीपेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकीळा लक्ष्मण महाले (वय-६०) रा. जोशी पेठ भोई गल्ली ह्या आई वृध्द आईसह राहतात. ६ जोवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगावातील देवीदास कॉलनीत राहणारी बहिण कल्पना बोरसे यांच्याकडे कोकीळा महाले ह्या आईसह गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कूलूप कापून घरातील वडीलोपार्जिंत तिजोरीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड लांबविले. व घरातील संपूर्ण सामान अस्तव्यस्त केले होते. दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे रंजना महाले यांनी कोकीळा महाले यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे कळविले. कोकीळा महाले यांनी तत्काळ घरी येवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले. शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघूनाथ महाजन करीत आहे.

Protected Content