भास्कर मार्केट येथे गरीब कुटुंबातील एचआयव्ही बाधीत मुलांसाठी सेवारथ परिवाराचा सकस आहार उपक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गरीब कुटुंबातील एच आय व्ही बाधीत मुलांच्या साठी सेवारथ परिवाराच्या वतीने गेल्या आठ वर्षांच्या पासून सकस आहार केला जात आहे सेवारत परिवाराच्या प्रमुख नीलिमा सेठीया आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर सोमवार, २७ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील भास्कर मार्केट जवळ असलेल्या जैन हॉल मध्ये हा वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी यावेळी समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी,डॉ नीलिमा सेठीया, नीला चौधरी, प्रशांत चौधरी, मनीषा पाटील, वंदना पवार, खुशबू टाटिया, दिलीप गांधी,सुमतीलाल टाटिया, जोस्ना रायसोनी,सेवा धर्म परिवाराचे चंद्रशेखर नेवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रास्ताविक वंदना पवार यांनी केले. त्यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर याप्रसंगी प्रशांत चौधरी,भरत चौधरी आणि चंद्रशेखर नेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपक्रमात जनतेनी सहभागी व्हावे

एच आयव्हि बाधीत मुलांना गोळ्या औषधी बरोबर सकस आहार मिळणे गरजेचे असते,मात्र अनेक मुलांचे पालकांचे निधन झाल्याने या आई वडील नसलेल्या मुलांचा सांभाळ करण्यात अनेक नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेत सेवारत परिवाराच्या वतीने या सकस आहाराच दर महिन्याला वाटप करण्यात येत असते,या उपक्रमात जनतेनी सहभागी होण्याचं आवाहन डॉ नीलिमा सेठीया यांनी केले आहे. या उपक्रमात काही एच आय वी बाधित मुलांच्या शिक्षण आणि सकस आहाराची जबाबदारी आपण घेणार असल्याचं प्रशांत चौधरी यांनी उपस्थित मुलांना यावेळी बोलतांना आश्वासन दिले आहे.

Protected Content