रावेर शौचालय घोटाळा : संशयितांवर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल होणार !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील पंचायत समितीत शौचालयाच्या अनुदानात झालेल्या घोटाळ्यात संशयित आरोपींच्या विरोधात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणातील संशयित आरोपींविरोधात २७ जणांविरोधात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील पंचायत समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसह एजंटांनी अनुदान वितरणाचा लाभ घेत सुमारे एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी २० एप्रिलला गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सूक्ष्म पद्धतीने करीत या गुन्ह्यात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र पुढील आठवड्यात न्यायालयात पोलिसांतर्फे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रक्रिया सुरु आहे.

Protected Content