मुरारबाजी बहुउद्देशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी । गणेश उत्सवानिमित  शहरातील मुरारबाजी बहुउद्देशीय संस्था शिवराज्य प्रतिष्ठान जळगाव शहरच्यावतीने रविवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी सामाजिक कार्यकर्ते तथा मनपातील महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सपकाळे यांचे पती भरत सपकाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विविध प्रकारच्या ६० रोपांची लागवड करून त्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी परिसरातील नागरिकांनी स्वीकारली.  संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देवून भरत सपकाळे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना परिसरातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या सोडविण्याचे आश्वासन भरत सपकाळे यांनी नागरिकांनी दिले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हितेश पाटील, उपाध्यक्ष राहुल मराठे, सचिव प्रवीण पाटील यांच्यासह पंकज माळी, राहुल इंगळे, अमोल मराठे, नितीन खोद्रे, जगन पाटील, भटू बोरसे, राहुल पाटील, धिरज भोसले धनराज कोळी, हेमंत पाटील आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!