फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संस्थेच्या पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संस्थेच्या (२०२१-२०२६) पंचवार्षीक  निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. इच्छुक उमेदवारांनी  उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक अधिकारी डॉ. व्ही.आर.पाटील यांनी वैध उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

फैजपूर शहरातील तापी परिसर विद्या मंडळाची ही संस्था मोठी आहे.  या संस्थेच्या २०२१ ते २०२६ या पंचवार्षीकसाठी निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषी करण्यात आला होता. यात पात्र उमेदवारांनी अर्ज भरले होते. दरम्यान, रविवारी १९ सप्टेंबर रोजी सर्व सभासदांनी माघारीचे अर्ज आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे सोपविले होते. व आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. त्यानुसार निवडणूक अधिकारी डॉ. व्हि.आर. पाटील यांनी वैध उमेदवारांची निवड यादी घोषीत केली आहे.

यात अध्यक्षपदी आमदार शिरीष चौधरी,  उपाध्यक्ष डॉ.एस.के.चौधरी, मिलींद शंकरराव वाघुळदे, चेअरमन लिलाधर चौधरी,  व्हा.चेअरमन प्रा.किशोर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, सहसचिव प्रा.नंदकुमार भंगाळे यांच्यासह  नियामक मंडळ सदस्य याप्रमाणे पात्र उमेदवारांची निवड यादी घोषित करण्यात आली. निवडणुकीत निवडणुक अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील आणि त्यांना सहाय्यक निवडणुक अधिकारी डॉ. आर. एल. चौधरी आणि मदतनीस नितीन सपकाळे यांनी काम पाहिले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!