मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाचा उल्लेख टाळला, ही मराठी माणसांचा अपमान करणारी कृती असल्याची टीका राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर मंगेशकर कुटुंबियांवर केली आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’प्रदान करण्यात आला. यावेळी मंगेशकर कुटुंबियांसमवेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य उपस्थित होते. मात्र आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. याच मुद्द्यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली आहे.
राज्यातच नव्हेत देशभर अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव वगळणे, ही कृती राज्यातील १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी असल्याचे मंत्री आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर म्हटले आहे.