Theft : बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविले

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदा आनंदा पाटील (वय-५१) रा. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणामुळे कुटुंबीय हे छतावर गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत, गोदरेज कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंब जागे झाले तेव्हा उघडकीला आला. याप्रकरणी मुकुंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Protected Content