जळगाव प्रतिनिधी । येथील लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्र निकेतन येथे सुरू झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला आज रविवार २० रोजी शंभर लिटर सॅनिटाइझर “मनोकल्प प्रतिष्ठान” तर्फे देण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक मनोज वाणी ,राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
आज दुपारी 1 वाजता लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई शिंदे, तसेच बहिणाबाई कोविड केअर सेंटरचे पदाधिकारी सचिन धांडे, चंदन कोल्हे, ऍड. पुष्कर नेहते, भूषण बढे, तुषार वाघुळदे, तसेच युरोसर्जन डॉ.अनिल पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.विलास भोळे, छाती विकार तज्ज्ञ डॉ.चेतन चौधरी, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.जितेंद्र कोल्हे यांचीही खास उपस्थिती होती. चंदन कोल्हे आणि प्रतिभाताई शिंदे यांनी मनोज वाणी यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रकोप हा वाढतच चालला आहे , संक्रमित रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. दररोज रुग्णांना दर्जेदार सात्विक आहार, प्रोटिनयुक्त नाश्ता, चहा दिला जात आहे. लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चातर्फे केवळ सामाजिक बांधिलकी जपून रुग्णांना सहकार्य म्हणून विनामूल्य हे बहिणाबाई कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून त्यासाठी अनेक आश्रयदात्यांनी ही स्वतःहून मदतीचा हात पुढे केला आहे , त्याबद्दल त्यांचे समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून कौतुक होत आहे.