हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या महिलेला शिवीगाळ करत मंगळसुत्र तोडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना गुरूवार २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. दरम्यान, डिसेंबर २०२३ ते २५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या काळात संशयित आरोपी हिमालय कांतीलाल वाघेला रा. पोलीस मुख्यालय, जळगाव हा महिला कामावर असतांना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. दरम्यान गुरूवार २५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महिला ही हॉस्पिटलच्या विश्रांती रूममध्ये आराम करत असतांना संशयित आरोपी हिमालय वाघेला हा महिलेच्या खोलीत घुसला. त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. याला विरोध केल्याने महिलेचे मंगळसुत्र तोडून महिलेला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जवळच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हिमालय वाघेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील ह्या करीत आहे.

Protected Content