Home Agri Trends मंजूर पीक विमा द्या ; शेतकऱ्यांचे आमदार शिरीष चौधरी यांना ...

मंजूर पीक विमा द्या ; शेतकऱ्यांचे आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन


 

 

 

सावदा ता रावेर : प्रतिनिधी । मंजूर पीक नुकसान  विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 

तालुक्यात जून २०२० या महिन्यात वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या पिकांचा नुकसान भरपाई विमा मंजूर झालेला आहे, तरीसुध्दा विमा मंजूर रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही, म्हणून ती मंजूर विमा रक्कम त्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी  अशी मागणी राष्ट्रवादीचे  रावेर तालुका  कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी निवेदनाद्वारे  आमदार शिरीष दादा चौधरी यांच्याकडे  केली.

 

यावेळी किरण पाटील ( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ रावेर) ,राजेंद्र महाजन, विकास पाटील,किरण पाटील, संतोष नवले, योगेश सैतवाल, ज्ञानेश्वर चौधरी, ( सावखेडा ) , मनोज बढे, महेश वानखेडे , गिरीश भारंबे, कुष्णा नेहेते, रमेश महाजन ( रोझोदा ) ,  गोकुळ पाटील, हिरामण पाटील, गणेश पाटील (कोचूर) , महेंद्र पाटील ( गौरखेडा)   व  रावेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound