नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस करणार कारवाई !

 

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकार्‍यांना कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत.

 

कोविडच्या आपत्तीत पोलीसांना साथरोग नियंत्रणाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. मध्यंतरी ही कारवाई शिथील करण्यात आली होती. तथापि, अलीकडच्या काळात रूग्णसंख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोलिसांना कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत.

 

याच्या अंतर्गत शासनाने कोविडसाठी जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १९५ मधील प्रक्रियेला अनुसरून भारतीय दंड संहिता १९६० कलम १८८; आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

Protected Content