भारत-चीन सीमेवर पुन्हा संघर्ष

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे . पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ चीनी सैनिकांकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे . पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याचं समोर आलं. चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

चीनी सेनेच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या जवानांनी शेवटच्या बैठकीत झालेला करारही तोडला आणि पूर्व लडाख भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावर चीनी सेनेची घुसखोरी रोखली, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.

Protected Content