न्याय यंत्रणेत मुस्लीम, दलीत व आदिवासीवर अत्याचार-ओवेसी यांचा आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील न्याय यंत्रणेत मुस्लीम, दलीत व आदिवासी समुदायावर अत्याचार होत असल्याचा आरोप एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. एका बातमीच्या आधारे त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

खासदार ओवेसी यांनी तुरुंगात कैद असलेल्या मुस्लिमांच्या संख्येशी संबंधित बातमी ट्विट केली आहे. मुस्लिम पुरुषांना मोठ्या संख्येने आधीपासूनच कैद करून ठेवण्यात आले आहे, आता त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कायद्याच्या नजरेत हे लोक निर्दोष आहेत, मात्र आताही ते अनेक वर्षे तुरुंगाचा सामना करत आहेत. असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी यानी एका इंग्रजी दैनिकात आलेली एक बातमी ट्विट करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने देशभरातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या कैद्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्या आकड्यांवरून तुरुंगात बंद असलेल्या मुस्लीम, दलित आणि आदिवासींची संख्या देशातील त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीहून वेगळीच आहे. इतर मागासवर्गीय आणि उच्च जातींबाबत मात्र असे चित्र नसल्याचे ओवेसी यांनी नमूद केले आहे.

यात म्हटले आहे की, मुस्लिम समुदायातून तुरुंगात आलेले लोक हे दोषी असण्यापेक्षा ज्यांच्यावर खटले सुरू आहेत असे कैदी अधिक आहेत, असे सन २०१९ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. २०१९ या वर्षांच्या शेवटपर्यंत तुरुंगात कैद असलेल्या सर्व दोषींमध्ये दलितांची संख्या २१.७ टक्के इतकी आहे. त्यांच्यावर खटले सुरू आहेत १४.२ टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांपैकी एकूण १६.६ टक्के कैदी आहेत. यांपैकी १८.७ टक्के लोकांवर खटले सुरू आहेत. हा यंत्रणेद्वारे होणार्‍या अन्यायाचा आणखी एक पुरावा आहे, अन्यायाचा आम्ही सामना करत आहोत, असे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

Protected Content