भारतरत्न डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे शिक्षणदिन सप्ताह व्याख्यानमालेने उत्साहात संपन्न

जळगाव, प्रतिनिधी | येथील भारतरत्न डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी संलग्न शाखा पाचोरा, एरंडोल,रावेर शाखेच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न डॉ .मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या औचित्याने शिक्षणदिन सप्ताह अंतर्गत ” शिक्षणातील संस्कार मूल्ये व गुणवत्ता विकास मंथन ” उद्दिष्टाने मान्यवरांच्या व्याख्यानमालेने दिनांक ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ दरम्यान उत्साहात संपन्न झाला.

कोरोना कालावधीत शासकीय सार्वजनिक निर्बंधामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण यंत्रणेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यात परिस्थितीजन्य दुरावा निर्माण झाला.शिक्षकांनी विविध तंत्रज्ञानाद्वारे अध्यापनासाठी अखंड धडपड केली.पालकांची कळकळ व विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनासाठी अध्ययनाच्या तळमळीतून निर्माण झालेले सकारात्मक वातावरण निर्मितीतील फायदे-तोटे दिसून आले .शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या सुविधा व पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली दरीची पहिल्यांदा शिक्षणक्षेत्रासह पालकांना जाणीव झाली . कोरोना महामारी 19 मध्ये विद्यार्थ्यांचे अभ्यासातून उडालेले मन, किमान अध्ययन क्षमतांचे विस्मरण झाल्याने तब्बल दोन वर्षे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पठारावस्थेत गेली ! दरम्यानच्या कालावधीत शिक्षणतज्ज्ञांनी सांगितलेल्या सृजनशील नुतन अध्यापन पद्धतीवर मुक्तचर्चा, व्याख्याने,लेखन केले . या बाबींवर बौद्धिक, भावनिक, शारीरिक स्तरानुसार गुणवत्ता विकासाच्या अनुषंगाने विचारमंथन होण्यासाठी मान्यवरांचे ऑडिओ , व्हिडिओज पुस्तक भिशीतर्फे मागवण्यात आली .सन्मानपूर्वक भारतरत्न डॉ .ए .पी .जे . अब्दुल कलाम या स्वतंत्र यू ट्यूब चैनलवर मराठी, हिंदी व इंग्रजीतील व्याख्याने पुढीलप्रमाणे विषयानुक्रमे प्रसारित करण्यात आली .आठवड्यात व्याख्यानांना शिक्षक , शिक्षणप्रेमी पालक व विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला .

प्रथम पुष्प – ” शिक्षणमंत्री भारतरत्न डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जीवन परिचय ” : डॉ. शाकीर शेख [ पुना कॉलेज पुना – दि. ११ ] द्वितीय पुष्प – ” आज साने गुरुजी असते तर ” : पंकज प्रतापराव शिंदे [ प्रताप विद्यालय, चोपडा ] तृतीय पुष्प – ” आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर ” : रमेश चौधरी [ ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट नंदुरबार ] चतुर्थ पुष्प – ” पाठ्यपुस्तकांतील कवितांमधून जीवनमूल्यांचा संस्कार ” : साहित्यिका तथा सुप्रसिद्ध बालकवयित्री सौ. मायाताई धुप्पड [ जळगाव ] पाचवे पुष्प – ” शारीरिक हालचाली व आहाराचा गुणवत्तेशी अनोन्य संबंध ” : विक्रमवीर एकपात्री अभिनेता प्रविण माळी, शिरपुरकर [ प्रभारी मुख्याध्यापक, जि.प . प्राथमिक शाळा, अजंतीसिम ता.चोपडा ] सहावे पुष्प – ” शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ” : विनायक साळवे [ महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस , नंदुरबार ] पुष्प सातवे – ” Mr .Maulana’s educationals thought ‘s ” : Dr . Asif Khan [ Assistant professor Department of English poona college , camp, PUNE ]

शिक्षणदिन सप्ताहाचे आयोजन

भारतरत्न डॉ .ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी केले .सदरहू सप्ताह आयोजित करण्याची प्रेरणा भिशीचे मार्गदर्शक तसा प्रेरणास्थान निवृत्त जळगाव डायट प्राचार्य निळकंठ गायकवाड , भिशीचे संस्थापक मार्गदर्शक निवृत्त शिक्षण उपसंचालक (प्राथमिक ) तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर , निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,डॉ . शेख मोहम्मद शाकीर शेख बशीर (पुणे) , तज्ज्ञ शिक्षक रमेश जगताप ( चोपडा ),डॉ.अशोक कौतिक कोळी,डॉ.वाल्मिक अहिरे , पत्रकार शिवाजीराव शिंदे, पत्रकार दीपक महाले,डॉ.विजय बागुल, प्रकाशक युवराज माळी मान्यवरांनी दिली.अमूल्य मार्गदर्शन पाचोरा पुस्तक भिशी समन्वयिका श्रीमती सारीका पाटील व श्रीमती अरुणा उदावंत , एरंडोल समन्वयिका श्रीमती शमा साळी, समन्वयिका श्रीमती अंजुषा विसपुते, रावेर समन्वयक कलाशिक्षक अर्जून सोळुके यांनी केले .शिक्षण सप्ताहाच्या यशस्वितेसाठी क्रियाशील सदस्य ह.भ.प.मनोहर खोंडे ,प्रभारी केंद्रप्रमुख अरुण वांद्रे , श्रीमती छाया पवार पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती ज्योती राणे ,कलाशिक्षक सुनिल दाभाडे, महेश शिंपी सर, सुदाम बडगुजर ,अभियंता प्रमोद माळी व मिलींदकुमार काळे यांनी अमूल्य सहकार्य केले .

Protected Content