भीषण अपघात : दुचाकी अपघातात रोडवर पडल्याने महिलेला ट्रकने चिरडले

मुलगा दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साखरपुडाचा कार्यक्रम आटोपून जळगावात घरी परतत असतांना दोन दुचाकींच्या अपघातात महिला रोडवर पडल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडल्याचे दुदैवी घटना मंगळवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी गोदावरी हॉस्पीटलनजीक घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जुबेदा बेग अल्ताफ बेग (वय-४८) रा. समता नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जुबेदा बेग अल्ताफ बेग ह्या समता नगरात पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. मंगळवारी ३ जानेवारी रोजी सकाळी जुबेदा बेग ह्या सावदा ता. रावेर येथे नातेवाईकांकडे साखरपुडाचा कार्यक्रमासाठी मुलगा कमिन बेग अल्ताफ बेग याच्या सोबत दुचाकीने गेल्या होत्या. साखरपुडाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी जुबेदा बेग ह्या मुलासह दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोदावरील हॉस्पिटलच्या पुढे नशिराबाद रोडवर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात जुबेदा बेग ह्या रोडवर पडल्या, तितक्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा कमिन बेग हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला जवळच असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: