‘शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द’ची घोषणा – पाचोऱ्यात कॉंग्रेसचा जल्लोष

पाचोरा, प्रतिनिधी । शेतकर्‍यांवर अन्याय करणारे काळे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान यांनी केल्यामुळे हा लोकशाहीचा विजय आहे असं म्हणत पाचोऱ्यात कॉंग्रेसने जल्लोष केला.

शेतकर्‍यांच्या संदर्भातील तीन कायदे भाजपाप्रणित, पंतप्रधान नरेद्र मोदीं यांनी आणले होते. याविरोधात शेतकर्‍यांनी जोरदार निदर्शने केले. आजही दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकरी शहीद झाले. या आंदोलनाचे फलित म्हणून लोकशाही असलेल्या आपल्या देशात अखेर पंतप्रधान यांना तीन कायदे रद्द करण्याविषयीची घोषणा करावी लागली.

या घोषणेमुळे पाचोरा कॉग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष अॅड.अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, राजू महाजन, प्रा.एस.डी. पाटील, मुख्तार शहा, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरिफ शेख, महीला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा अॅड.मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, सचिव संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्ताफ पठाण, फारुख शेख, अरबाज पठाण, रवी पाथरवट, इब्रान खान, समाधान ढाकरे, कुंदन परदेशी आदी उपस्थित होते.

Protected Content