महिलांनी उमेद अभियानात सहभागी व्हावे : संपदा पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू असून महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी होण्याचे आवाहन उमंग समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदा उन्मेष पाटील यांनी केले. त्या तालुक्यातील आडगाव येथील कार्यक्रमात बोलत होत्या.

चाळीसगाव पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्राच्या ग्रामविकास विभाग आयोजित तालुक्यातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित आडगाव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात सौ.संपदाताई पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आडगावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील, शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.चव्हाण, ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, अभियान समन्वयक प्रताप शिवरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर पिंप्री प्रदे येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच सचिन पाटील, सुभाष काका पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापमामा पाटील, समन्वयक विकी पाटील, उपसरपंच मंगलबाई गुलाब पाटील, ग्रा.पं.सदस्य सुनंदाताई पाटील, उज्वलाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सौ. संपदाताई पाटील पुढे म्हणाल्या की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे.ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडून जगात उपलब्ध असलेल्या आर्थिक प्रगतीच्या पर्यायांना निवडून आपल्यासह आपल्या परिवाराचे आर्थिक उन्नती साधावी यासाठी जीवन्नोन्नती अभियान असून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून माझ्या महिला भगिनींनी स्वयंसहायता, समूह ग्रामसंघ, प्रभाग संघ,शेतकरी उत्पादक संघ, उत्पादक गट तसेच पंचायतराज संस्थातील सदस्य यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपल्या जीवनात आर्थिक क्रांती साधावी.

सौ. संपदाताई पुढे म्हणाल्या की, आज ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर भगिनींनी अनेक व्यवसाय मध्ये बचत गटाच्या माध्यमातून नावलौकिक कमावला असून चूल आणि मूल याव्यतिरिक्त देखील आपले जग असून या जागेला जगाला कवेत घेण्यासाठी कंबर कसली आहे. आपल्या मनातला संकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या माता- भगिनींनी परिवाराची जबाबदारी सांभाळताना देखील आर्थिक साक्षरता जोपासत आर्थिक उन्नती साधली याची अनेक उदाहरणे आता समाजात दिसू लागकी आहे. सर्वसामान्य व्यक्ती गरिबीतून बाहेर पडू शकतो. मात्र त्यास आवश्यक विश्वास उमेदअभियानाची मदत घ्यावी.यातून सर्वसामान्य महिला भगिनी गरिबीतून बाहेर पडू शकते हा विश्वास देण्याचं काम उमेद अभियानाने केले आहे.

तालुका समन्वयक प्रताप शिवरकर यांनी प्रास्ताविक केले. आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी संपदाताई पाटील यांचा सत्कार केला. आडगाव, पिंप्री, देवळी, डोणदिगर, टाकळी प्रदे ,तळोदे प्रदे, देशमुखवाडी ,तामसवाडी, उपखेड,अलवाडी, चिंचखेडे पिंपळवाड म्हाळसा, पातोंडा, रांजणगाव यासह विविध ठिकाणी या अभियानाअंतर्गत महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Protected Content