बदललेल्या चिनीनीतीनंतर नवीन व्यूहविचार – नौदलप्रमुख

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय नौदल चीनवर लक्ष ठेवून आहे. चीन इतरांप्रमाणे विचार करत नाही, त्यांची रणनीती वेगळी आहे. ते ध्यानात ठेवून आता भारतीय नौदलातर्फे नवीन व्यूहविचार आकारास येत असल्याचे प्रतिपादन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी  केले.

 

प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पिन पाणबुडी ‘आयएनएस करंज’ समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नौदलप्रमुख बोलत होर्ते. हिंदी महासागरातीलच नव्हे तर देशाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या सागरी सीमा अभेद्या राहण्याची खातरजमा करण्यासाठी अलीकडे देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर व बेटसदृश्य असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या सागरीसीमांवरही एकाच वेळेस ‘सी व्हिजिल’ युद्धाभ्यास पार पडला. त्यामध्ये लक्षात आलेल्या काही बाबींनंतर सागरीसुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे सांगून अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले की, ‘आयएनएस करंज’ ही आत्मनिर्भर भारत योजनेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. कारण यापूर्वी कलवरी वर्गातील दोन्ही स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मिती- तपासणी आणि त्यावरील नौदलाच्या ताफ्याचे प्रशिक्षण यात फ्रेंच सहभाग होता. मात्र ‘आयएनएस करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे. येणाºया काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

 

भारतीय संरक्षण व विकास संस्था डीआरडीओने इंधन संचावर चालणाºया एअर प्रोपल्शन यंत्रणेची निर्मिती केली असून तिच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे मंगळवारीच जाहीर केले आहे. येणाºया काळात कलवरी वर्गातील स्टेल्थ पाणबुड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात येईल. त्यामुळे या पाणबुड्यांचे शक्तिसामथ्र्य दुणावेल, असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, भारतीय नौदलाच्या पाणबुडी ताफ्यातील काही पाणबुड्यांचे आयुष्यमान संपत आले असून तातडीची गरज म्हणून एकूण सहा पाणबुड्यांचे आयुष्यमान वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या सहाही पाणबुड्या नंतर १० वर्षे अधिक वापरता येतील अशा प्रकारचे त्यांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे.

 

नौदलाचे सामथ्र्य वाढवणारी आणि शेजारील शत्रू राष्ट्रांची चिंता वाढवणारी ‘स्कॉर्पिन’ श्रेणीतील आयएनएस ‘करंज’ पाणबुडी बुधवारी नौदलात दाखल झाली. मेक इन इंडियाअंतर्गत माझगाव डॉकयार्डमध्ये याची बांधणी करण्यात आली आहे. करंज ही जगातील सर्वात लहान पाणबुड्यांपैकी एक असून त्याची लांबी ६७.५ मीटर, तर उंची १२.३ मीटर इतकी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंना अचूक हेरून त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता, कमी आवाजामुळे शत्रूंना सहजपणे चकवा देणे यासह १८ टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदी या पाणबुडीची वैशिष्ट्ये आहेत.

 

ऑक्सिजन बनवण्याची क्षमता पाणबुडीत असून त्यामुळे जास्तीत जास्त ही पाण्याखाली राहू शकते.  आयएनएस करंज पाणबुडीची इंजिन हे डिझेल व इलेक्ट्रिकलवर आहे.  यात ३६० बॅटरी सेल आहेत. प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे ७५० किलोग्रॅम आहे, तर त्यात दोन १,२५० किलोवॅट डिझेल इंजिन आहेत.

करंज १२ हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते व ४५ दिवसांपेक्षा जास्त पाण्यात राहू शकते.  ३५० मीटर खोलवर जाऊन शत्रूचा शोध घेणे शक्य

Protected Content