यावल येथे महाशिवरात्रीनिमित्ताने श्री काळभैरव मंदीरात पुजा

 

यावल, प्रतिनिधी । येथील बसस्थानक परिसरातील श्री काळभैरव मंदीरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवाशी भाविकांसाठी प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावल बसस्थानक परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदीरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव दर्शना भाविकांची सकाळपासुन वर्दळ दिसुन आली. याप्रसंगी परिसरातीत तरूण मित्रमंडळीच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, श्रीकाळभैरव मंदीरात पुजाअर्चना करण्यात आली. यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक शांताराम व्ही. भालेराव , वाहतुक नियंत्रक संजय मोरे, वाहतुक नियंत्रक डी.पी. महाजन, पत्रकार अरूण पाटील, सुधाकर धनगर यांच्यासह आदी मान्यवरांनी उपस्थिती पुजाअर्चना करण्यात आली. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा प्रवाशी भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी संजय पवार, मंदार चव्हाण, आकाश कोळी, विलास चौधरी, जयेश बैरागी, सिद्धार्थ घारू, गणेश मेढे, संदीप माळी, नकुल माळी, विर येवले, दिपक मंदवाडे, मिथुन बारी आदींनी कामकाज पहिले. 

Protected Content