चार मुलांच्या मातेने प्रियकरासोबत थाटला संसार !

यावल अय्यूब पटेल । प्रेम हे आंधळे असते असे म्हटले जाते. याचीच प्रचिती देणारी घटना तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. येथील चार मुलांच्या मातेने आपल्या पतीला घटस्फोट न देता प्रियकरासोबत संसार थाटला असून आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील नायगाव येथील राहणारे प्यारसिंग भाया बारेला यांनी यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी बोंदरीबाई बारेला (वय ३८) ही मागील वर्षी किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करीत आपल्या ९ वर्षीय मुलगा, ८ व ६ वर्षीय मुलगी आणि  ६ महिन्याच्या लहान बाळाला सोडून धोपा भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश)  आपल्या माहेरी निघुन गेली होती. तेव्हा पासुन वारंवार पत्नीस नातलगांच्या व स्वत:हा विनंती करीत सासरी परत येण्यासाठी पती प्यारसिंग बारेला यांनी प्रयत्न केले. तरी देखील वर्ष उलटले पत्नी काही येत नसल्याचे पाहुण म्हणुन ते स्वत:हा आपल्या सासरवाडी धोपा ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश गेले असता त्यांच्या पत्नीने धोपा येथे राहात असतांना भगवानपुरा येथे राहणाऱ्या भल्या इतू वास्कले या व्यक्ति सोबत लग्न केल्याचे समजले. हे एकताच त्यास धक्काचं बसला.

तेव्हा प्रेमात पडलेल्या या विवाहिता चार लहान मुलांना व पतीला सोडून थेट दुसऱ्याशी लग्न लावल्याने निराश झालेला प्यारसिंग बारेला याने  अखेर यावल पोलिस स्टेशनला आपल्याच चार मुलांची असलेल्या पत्नी बोंदरीबाई बारेला व सासरे तुताराम अंकऱ्या बारेला व आपल्या पत्नीचा दुसरा नवरा भल्या वास्कले या तिघांच्या विरूध्द पती असतांना व घटस्पोट न घेता परस्पर लग्न केले म्हणुन यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Protected Content