जामनेरात अंजूमन हायस्कूल समोर दांगडो; जामनेर पोलीसात दंगलीचा गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी । येथील अंजूमन उर्दु हायस्कूलमध्ये शाळेच्या सभासदांची सर्वसाधारण सभेच्या कारणावरून संस्थेचे अध्यक्षांसह इतरांना बेदम मारहाण करून जखमी केले तर तर दोन कारांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घडली. तीन दिवसानंतर काल मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात ११ जणांसह इतर अनोळखी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील अंजूमन उर्दू हायस्कूल शाळेत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ध्वजारोहण केल्यानंतर सकाळी १० वाजता शाळेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. सभा आटोपल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व त्यांचा मुलगा शोएब नुर मोहम्मद पटेल (वय-४४) रा. नाचनखेडा ता. जामनेर हे कारने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी शाळेच्या अवारात ३० ते ४० जणांचा जमाव उभा होतो. यातील अनीश शेख बिसमिल्लीह शेख याने दोन्ही कार आडविल्या आणि शोएब यांच्या कारवर दगड फेकून मारला. यात कारचे मोठे नुकसान झाले तर फायटरने बेदम मारहाण केली. तसचे संशतिय आरोपी अनिस सोबत असलेले रिजवान अब्दुल लतीफ, जावेद शेख युसूफ, युनूस शेख अय्युब, सैय्यद इमरान सैय्यर इरफान, निहाल शेख इब्राहिम, अबुल आला शेख, मुज्जफर आसिफ मेहमूद शेख, आसिफ मेहमुद शेख , अजीम शेख मज्जीद, सुफियाना खान शेख अनिस, जाकीर खान नबा खान सर्व रा. जामनेर यांच्यासह १० ते २० अनोळखी जण्णांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील संशयित आरोपी जावेद शेख युसूफ याने चाकूने मारून टाकण्याची धमकी दिली आणि गाडीच्या काचा फोडून टाकल्या. या झटापटीत फिर्यादी शोएब यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिश्यातील ७ हजार २०० रूपये काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या सर्वांनी जामनेर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर काल मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता मारहाण करणाऱ्यांविरोधात शोएब नुर मोहम्मद पटेल यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात ११ जणांसह अनोळी २० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रीयाज शेख गयाज शेख हे करीत आहे. 

Protected Content