फोन टॅपिंग करण्याचा नीच व घृणास्पद दुदैवी प्रकार – माजी मंत्री एकनाथ खडसे (व्हिडिओ)

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात माझ्यासह पी.ए. व समर्थकांचा महत्वाच्या व्यक्तीच्या नावात बदल करून त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा नीच, घृणास्पद दुर्दैवी प्रकार करण्यात आला. या संदर्भात पोलीस शोध घेत असून योग्य वेळी खुलासा होईलच, असा विश्वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला.

 

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, विधानसभा २०१९च्या सार्वत्रिक निवडणूक काळात कुलबा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस महाआयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ६७ दिवसांच्या कालावधीत माझ्यासह माझे पीए तसेच समर्थक अशोक लाडवंजारी यांच्याशी संबंधीत व्यक्तीचे फोन टॅप करण्यात आले. गेले ४० वर्ष ज्या व्यक्तीने पक्ष वाढविण्यास मेहनत घेतली त्याच व्यक्ती विरोधात कुणाच्या तरी वरिष्ठ मंत्री स्तरावरून अथवा गृहमंत्र्यांकडून सुचना असल्याशिवाय फोन टॅपींग करणे शक्य नाही. मी पुन्हा येईन, च्या वादात हे फोन टॅप केले गेले असावेत. या संदर्भात मी गृहसचिवांकडे देखील तक्रार दाखल केली आहे. नेमकं फोन टॅप करण्यास सांगणारी व्यक्ती कोण ? किंवा समाजविघातक कृत्य करीत असल्याचे सांगत माझ्या नावात बदल करण्यात येवून हे फोन टॅप करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू असून योग्यवेळी खुलासा होईलच परंतू हे वरिष्ठ गुह खात्याच्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तीच्या सांगण्यानुसार होणे शक्य नसल्याचे सांगत निचकृत्य व हलकटपणाचा अगदीच कळस असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फोन टॅपींग प्रकरणाविषयी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1002991137089605

 

Protected Content