आयुक्तांची गाडी विना अडथळा निघाली, तर राजीनामा देईल ; अतिक्रमणावरून नितीन लढ्ढा आक्रमक

nitin laddha

 

जळगाव (प्रतिनिधी) आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा हे चांगलेच आक्रमक झाले होते. आयुक्तांनी जून्या कापड गल्लीतून आपली गाडी विना अडथळा काढून दाखवावी. जर विना अडथळा गाडी निघाली तर मी राजीनामा देईल, असे आव्हानच श्री. लढ्ढा यांनी यावेळी दिले.

 

महापालिकेची स्थायी समितीची सभा आज (ता.15) स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपिठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. यावेळी लढ्ढा पुढे म्हणाले की, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या दुर्लक्षामुळ तसेच त्यांच्यातील लागेबंधामुळे आज शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण परिस्थीती विदारक आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अतिक्रमण संवर्धन व संरक्षण विभाग, करा अशा तिव्र शब्दात यांनी नाराजी व्यक्त केली. हॉकर्सला ख्वॉजामीया मैदान, जूनी सानेगुरूजी रुग्णालयाची जागेत स्थलांतरीत करा व रस्ते मोकळे करा,अशी मागणी देखील त्यांनी केली.

 

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी शहातील बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. तसेच तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगेंनी देखील कारवाई केली. यात पक्के अतिक्रमण काढले गेले. परंतू या रस्त्यांवर पून्हा हॉकर्सचे अतिक्रमण वाढले आहे. यात गणेश कॉलनी, महाबळ, कलेक्‍टर बंगला तसेच फुले मार्केट ते शनिपेठच्या रस्त्याची परिस्थीती गंभीर आहे. याला जबाबदार महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग असून कारवाई होण्यापूर्वीच विक्रेत्यांना पथकाकडून सूचीत केले जाते. त्यामुळे कारवाईनंतर पंधरा मिनीटात “जैस थे’ परिस्थिती असते. पथकाच्या कर्मचाऱ्यांकडून कोणी तक्रार केली? याची देखील माहिती सांगितले जाते, असे सांगून अतिक्रमाणाचे फोटोच आयुक्तांना लढ्ढा यांनी दाखविले. तसेच सुप्रीम कॉलनीत 12 दिवस तर साहित्य नगरात 22 दिवसापासून पाणी आले नाही. एमआयडीसीला 25 लाख रुपये देवून नागिरकांना पाणी वेळेत मिळत नसल्याचे लढ्ढा यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

 

शिवसेनेचे सदस्य विष्णू भंगाळे यांनी बि. जे मार्केटमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे, तसेच मुख्य रस्त्यावरील बंद एलईडी पथदिव्यांचा तक्रार केली. तर लढ्ढा यांनी व. वा. वाचनालयाच्या रस्ता रुंदी करण कामातील दुभाजकातील खांबावरील ट्रान्सफॉम स्थलांतर करण्याचे काम दोन वर्षापासून प्रलंबीत असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्तांनी त्वरीत समस्या सोडवा अशा सुचना दिल्या. यावेळी आयुक्त म्हणाले, की 8 कोटी रुपये थकबाकी आपल्यावर असून सुप्रीम कॉलनीला पाणी मिळावे यासाठी आमदार व मी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी बोलून पाणी देण्यासाठी तयार केले. त्यामुळे 25 पैसे पाण्यात गेले. असा विषय नसून जलवाहिनीवर मिटर बसले असून त्यांना आता पाणी मिळणार आहे.

 

शासनाच्या महालॅब योजनेबाबत भाजप सदस्या उज्वला बेंडाळे यांनी मनपा दवाखाना अधिकाऱ्यास विचारणा केली. यावेळी डॉ. राम रावलानी यांनी महिन्याभरापासून महापालिकेच्या सर्व दवाखान्यात महालॅबचे कर्मचारी येवून रुग्णांचे रक्ताचे नमुने घेवून दुसऱ्या दिवशी रिपोर्ट देतात. रक्त तपासणीचे रुग्णांचे पैसे हे शासन महालॅबला देते असे सांगितले. यावर सौ. बेंडाळे म्हणाल्या, की योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी सदस्यांना तरी देत जा, जेणेकरून गरजू रुग्णांना सेवाचा अधिक लाभ होईल. तर महापालिकेत घाण वास येत असल्याची तक्रार भाजप सदस्य सदाशीव ढेकळे यांनी केली. यावर सभापतींनी बांधकाम अभियंता सुनील भोळेंना विचारणा केली. महापालिकेची सर्व ईमारतीच्या मजल्यावरील ड्रेनेज पाईप चोकअप आहे. दुरुस्तीला मोठा खर्च लागेल, अंदाजपत्र तयार करण्याच्या सुचना दिल्या आहे. यावर आयुक्त म्हणाले, की महापालिका आर्थिक परिस्थीती नाही. त्यात महापालिका निधीतून हे काम घेण्यास मक्तेदार नाही, असे सांगितले.

Protected Content