सव्वा महिना अखंड चाललेल्या राम नाम जपाची सांगता

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामद्वारा (जगत ) आकाशवाणी चौक लाड वंजारी मंगल कार्यालयजवळ तसेच रामद्वारा (जगत) कांचन नगर येथे सव्वा महिना अखंड राम नामाचे जपाचे आयोजन करण्यात आले होते. या जपाची सांगता राम नवमी रविवार दि. १० एप्रिल रोजी करण्यात आली.

 

जळगाव शहरातील रामद्वारा (जगत ) येथे राम नवमीनिमित्त शहरातील साडेसहाशे भाविकांनी राम नामाचे स्मरण करून सव्वा महिना अखंड राम नाम जपाची सांगता करण्यात आली. रामद्वारा (जगत) प्रवर्तक चांडक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद, राजस्थान, इंदौर, पुणे, जालना, नागपूर, अमरावती व इतर ४५ शहरात कार्यक्रम घेण्यात आला असे राज सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

Protected Content