धरणगावात राष्ट्रवादीतर्फे मास्कचे वाटप

धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव ग्रामीण रूग्णालयात फळे वाटप करण्यात आली. तर कोरोरानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नागरीकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ५०० मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,तालुकाध्यक्ष धनराज माळी, मोहन पाटील, तालुका कार्यध्यक्ष अरविंद देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, नरेंद्र पाटील, राहुल पाटील, गिरीष पाटील, डिंगबर सांवत
म, दोनगाव सरपंच क्रांतीकुमार कोळी, ज्ञानेश्वर पाटील,आकाश राणे, मनु चव्हाण, शालीक आण्णा, हिंमत पाटील, भुषण पाटील, सुभाष पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content