चिंताजनक : जिल्ह्यात आज नव्याने ४५१ कोरोना रूग्णांची भर; जळगावात उद्रेक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने गुरूवारी सायंकाळी दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात तब्बल ४५१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून १५९ रूग्ण आढळून आले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून आज २८५ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-५२, अमळनेर-१२, चोपडा-२१, पाचोरा-३, भडगाव-१२, धरणगाव-२०, यावल-१२, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-७, पारोळा-१८, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ४५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हार ७०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३४ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८० रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

 

Protected Content