पारोळा येथे मेघना चौधरीचा वृक्षरोपण करून वाढदिवस साजरा

पारोळा प्रतिनिधी | नगर परिषदेने वृक्ष लागवड व संवर्धनाचे आवाहन केले असता याला प्रतिसाद देत आठ वर्षीय मेघना विकास चौधरी या चिमुकलीने आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण २०२२एक झाड लाडाचं, माझ्या अविस्मरणीय दिवसाच नगर परिषदेतर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात सहभाग म्हणून शहारातील नागरिकांना वृक्षप्रेमिंना आपल्या अविस्मरणीय दिवसाची आठवण म्हणून वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याबाबत नगर परिषदेने आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत पारोळा येथील आठ वर्षीय मेघना विकास चौधरी यांनी त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करून त्याचा संगोपन करण्याचा निश्चय केला आहे. नगर परिषदेतर्फे ज्या नागरिकांना आपल्या परिवारातील व्यक्तींच्या वाढदिवस, लग्न वाढदिवस या सारख्या अविस्मरणीय दिवसांची आठवण म्हणून वृक्षरोपण करायचे असेल त्यांनी वृक्षरोपण केल्याचे फोटो, अभियान अंमलबजावणी कक्षाला पाठवावेत किंवा 9623222605 या मोबाईल नंबर वर वॉट्सअप करावा असे आवाहन करण्यात आले आहे. असे कार्य करणाऱ्या नागरिकांचे न. पा. मार्फत प्रसिद्धी व प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपल्या एका झाडामुळे पर्यावरण सुदृढ होईल व पारोळा नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अभियान २.० या उपक्रमात नामांकन वाढविण्यासाठी मदत होईल.

Protected Content