फैजपूर प्रतिनिधी । हिंदूराजा प्रतिष्ठान मर्दानी खेळ आखाडा संगमनेर यांनी राज्यस्तरीय ऑनलाईन मर्दानी खेळ आखाडा दिनांक 12 जुलै रोजी आयोजित केला होता. या स्पर्धेत फैजपूर येथील मनस्वी सचिन वाघोदेकर हिने मर्दानी आखाड्यात तिसरा क्रमांक पटकावून शहराचे नाव राज्य पातळीपर्यंत पोहचवले.
हिंदूराजा प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, संगमनेर यांनी राज्यस्तरीय ऑनलाईन मर्दानी खेळ आखाडा स्पर्धा १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल १३ जुलै रोजी ऑनलाइन स्वरूपात लागला यात फैजपूर येथील मनस्वी सचिन वाघोदेकर (वय ७ वर्ष) हिने तिसरा क्रमांक पटकावला या ऑनलाईन स्पर्धेत एकूण ५६ आखाडे महाराष्ट्र व महाराष्ट्रबाहेरील राज्यातून आखाडे यात सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्याबाहेर पहिल्यांदा या आखाड्यात शहराला मनस्वी वाघोदेकर च्या रूपाने मान मिळाला या स्पर्धेचा उद्देश शिवकालीन शस्त्र कला शिकावी आणि जपावी हा या आखाडया मागचा उद्देश होता. घराघरात ही कला जावी विशेष करून मुली व महिलांनी संरक्षण कला शिकावी हा उद्देश घेऊन हिंदू राजा प्रतिष्ठान मर्दानी आखाडा संगमनेर यांनी या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. तरी जास्तीत जास्त मुलींनी व महिलांनी ही कला अवगत करावी असे आवाहन मावळे ग्रुपचे मुख्य महेश वाघोदेकर यांनी केले आहे.