वाघोडा येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सत्कार

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे ना. राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ ​​बच्चूभाऊ कडू यांचा आज वाघोडा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी ना.बच्चूभाऊ कडू व प्रसार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अनिल चौधरी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला. सरपंच/पत्रकार मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी, मुबारक हसन तडवी, मुबारक मुशिर तडवी, अकबर अली तडवी, अजित युसुफ तडवी, भिकारी न्यामत तडवी, सलिम मुशिर तडवी, फिरोज फकिरा तडवी, सुलतान युसुफ तडवी, अजित निजाम तडवी, असलम महेबुब तडवी,  मुक्तार हबीब तडवी, रेहान सुभान तडवी, जुम्मा सायबु तडवी, अजित आली तडवी, हमीद जाहाबाज तडवी, भिकारी रुबाब तडवी, सुपडू महेबुब तडवी, शकिल महंमद तडवी, हसिर चांदखा तडवी, मलिक मुदस्सर बाला खान, मुसा मलक राजू रमजान आदिंसह १००ते १५० आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content