प्रवाशांनी आरक्षणासाठी कार्यालयात गर्दी करू नये- रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरक्षण कार्यालय बंद असल्याने आरक्षण तिकीट रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षणासाठी कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने आरक्षण तिकीटे रद्द केली आहे. रेल्वे प्रवासामुळे मोठ्याप्रमाणावर कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करण्यात आले आहे त्यामुळे रेल्वे आरक्षण कार्यालयात नागरिकांनी गर्दी करू नये, दरम्यान २५ मे पासून आरक्षण पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून आरक्षण सुरू झाल्यानंतर आरक्षण खिडकीवर येण्यापुर्वी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Protected Content