पहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर गरजूंना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. या कालावधीत हाताला काम नसल्याने गरीबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान ईद हा सण येऊन ठेपला आहे. मागील २ महिन्यांपासून कामच नसल्याने ईद कशी साजरी करावी या विवेंचनेत असतांना राष्ट्रवादीतर्फे गरजुंना शिरखुर्मा बनविण्यासाठी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व स्तरावर कामगार, मजूर, नोकरदार घरीच आहेत. या काळात विविध सामाजिक व राजकीय पक्षातर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. यातच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सणचाही समारोप होत आहे. ईद येऊन ठेपली असून समाजातील गरीब, गरजूंना हातात पैसा नसल्याने ईद सणावर विरजण पडले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल रायचंद लोढा यांनी पहुर पेठ येथील  मुस्लिम समाजातील गरजवंताना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप करण्यात आले. यावेळी ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर शंकर पाटील, अशोक देशमुख, शाम सावळे शैलेश पाटील, किरण पाटील, राजु जंटलमन, शरद पांढरे, रवी मोरे, सलिम शेख कादर, राजु किसन पाटील, पठाण मामु, वसिम शेख, सलिम शाह, शाकिर शेख, आमिन शेख, सलिम डायनोमा, आशीष माळी, ईरफान शेख आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content