पहूर येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांचा बक्षिस देवून सत्कार

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील गजानन दुध उत्पादक संस्थेतर्फे सर्वांधिक दुध संकलन करणाऱ्या शेतकऱ्याचा २१ हजार रूपये बक्षिस देवुन सत्कार करण्यात आला.

पहूर येथील गजानन दुध उत्पादक पतसंस्थेतर्फ जो शेतकरी एकवीस हजार लीटर दुध संकलन करील त्या दुध संकलन करणार्या शेतकर्यास २१००० रूपये बक्षिस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहूर पेठ येथील कैलास पाटील या शेतकर्याने तब्बल २१,५०० (एकवीस हजार पाचशे) लीटर दुध संकलन केल्याने आज गजानन दुध उत्पादक संस्थेच्या वतीने गजानन दुध उत्पादक संस्थेचे व ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर शंकर  पाटील, माजी जि. प. कृषी सभापती प्रदिप लोढा यांच्या हस्ते कैलास भानुदास पाटील या शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व एकवीस हजार रूपये चा धनादेश देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी गोकुळ कुमावत, अशोक देशमुख, विकास चौधरी, राजू जेन्टलमॅन, मीनाज भाई, शिवाजी राऊत, किरण पाटील, ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे मॅनेजर सुभाष चौधरी, विजय पाटील, सचिव गणेश पांढरे, मापारी कैलास पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content