आसनखेडा जंगलात पेटला वनवा; ६० एकरचे जंगल जळून खाक (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा वनपरिक्षेत्रात हद्दीतील आसनखेडा शिवारातील वनजंगलात आग लागली असून या आगीत सुमारे ५० ते ६० एकर जमिनीवरील पाला-पाचोळा, गवत व लहान झाडे झुडपे जळुन खाक झाले. सुदैवाने जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांना आगीची भनक लागल्याने प्राणी अन्य ठिकाणी पसार झाले. 

तथापि, या घटनेची माहिती आसनखेडा येथील पोलीस पाटील किरण पाटील यांना मिळताच त्यांनी गावकर्यांना सोबत घेत माजी उपसरपंच कैलास पाटील, गंभीर पाटील, श्रावण कोळी, सुपडू पाटील यांनी झाडाच्या फांद्यनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती वन अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना मिळताच नांद्रा वनपरिसराचे वनपाल सुनील भिलावे, वनरक्षक ललित पाटील, प्रकाश सुर्यवनशी, रामसिंग नाईक, वाहनचालक सचिन कुमावत घटनास्थळी पोचले. दरम्यान आग आटोक्यात येत नसल्याने पाचोरा पालिकेचे दोन व भडगाव नगरपालिकेचे एका अग्निशमन दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले होते. नांद्रा वनपरिक्षेत्रांतर्गत आसनखेडा पाहण, लाख, कोकडी, आंबे वडगाव, परिसरात सुमारे ४१९ हेकटर वनक्षेत्र असून यापैकी ५० ते ६० हजार हेकटर क्षेत्रावर वणवा पेटला होता. दुपारी २:३० वाजता आग लागल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. रात्री अंधार पडल्याने आग विझवण्यास व्यत्यय होती. सुदैवाने जंगलातील मोठे वृक्ष जळाले नसून प्राणीही सुरक्षित असल्याचे वनाधिकारी देसाई यांनी सांगितले. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

https://www.facebook.com/508992935887325/videos/817462758850475

Protected Content