रावेर येथे लॉकडाऊनमध्ये आदर्श विवाह

रावेर प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमध्ये आज येथे सोशल डिस्टन्सींगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करून आदर्श विवाह पार पडला.

रावेर येथील रवींद्र तुकाराम महाजन यांची कन्या स्नेहा व केर्‍हाळा येथील मोहन राजाराम पाटील यांचे चिरंजीव वैभव यांचा विवाह सोहळा घराच्या हॉल मध्ये चार लोक व एक पुरोहित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वधू स्नेहा ही डॉ प्रविण चौधरी व डॉ चैताली चौधरी (समृद्धी हॉस्पिटल रावेर )यांची भाची आहे.
या आदर्श विवाहा प्रसंगी डॉ प्रविण चौधरी व चैताली चौधरी यांचे कडून वधू वरास आशीर्वाद म्हणून काही सोन्याचा वस्तू व काही गरीब व गरजू कुटुंबाना प्रत्येकी ५०० रूपयांची मदत देण्यात आली. वधू-वर यांना नातेवाईक मंडळींनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. या विवाहाचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content