चाळीसगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

चाळीसागाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी येथी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून आज सायंकाळी झालेल्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला.

चाळीसगावात अद्याप कोरोनाबाधीत आढळून आला नसला तरी शेजारच्या पाचोरा तालुक्यासह मालेगाव व धुळे येथे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे येथे संसर्ग होण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी खासदार उन्मेषदादा पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात दिनांक १ ते ३ मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. यात फक्त मेडिकल स्टोअर्स व दवाखाने नियमीत वेळेत सुरू राहतील. तर भाजीपाला व दुध आदी सकाळी व सायंकाळी दोन तास उघडे राहणार आहेत. हा अपवाद वगळता शहर तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे.

Protected Content