पहूर येथे तीन दिवसांचा कडकडीत बंद

पहूर, ता . जामनेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गाने सारा देश हादरला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. याला आळा घालण्यासाठी व संसर्ग वाढू नये म्हणून पहूर पेठ व पहूर कसबे कोविड१९ समितीने १ मे ते ३ मे असे तीन दिवस संपूर्ण पहूर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.

जामनेर तालुक्याला जळगाव ,भुसावळ, पाचोरा या कोरोना बाधित तालुक्यांचा तसेच बुलढाणा व औरंगाबाद या जिल्ह्यांचा विळखा आहे .
पहूर हे गांव चौफुलीवरील गांव असून सर्वत्र दळणवळणाच्या सर्व सुविधा बंद असताना सुद्धा परगावाहून अनेक जन मोटारसायकलने तसेच पायी व अन्य मार्गाने येतच आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण पहूर गाव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .

दि .१ ते ३मे असे तीन दिवस गांव बंद राहणार असून विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे .यासाठी प्रशासनाने सहकार्य राहणार आहे. यावेळी कोविड१९ नियंत्रण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
पहूर पेठ व कसबे येथे कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर कडकडीत बंद ठेवन्यात येणार आहे. किराणा दुकान, भाजीपाला विक्री व इतर दुकाने सर्व बंद राहतील. मेडिकल तसेच दूध विक्री काही ठराविक काळा साठी सुरु राहतील. कोणीही जमाव करुन बसू नये.आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाला मदत करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content