अभाविपचा नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात

cb838dae 0f15 48e5 ad58 ab67453d0d74

जामनेर (प्रतिनिधी) नवीन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने येथे एक मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. मदत केंद्राचे उदघाटन उपप्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांच्या हातून करण्यात आले.

 

मदत केंद्रात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केले जाईल. मदत केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील अडचणी सोडविण्यात येत आहेत. अभाविप शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नवीन विद्यार्थ्यांसाठी हिताचे कार्य करीत असते. ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांना अभाविप मदत केंद्राचा फायदा होत आहे. अभाविपच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. विजेंद्र पाटील, प्रा. खंडायते अभाविपचे जळगाव जिल्हा संयोजक प्रमोद सोनवणे, मनोज जंजाळ, अक्षय जाधव, शुभम मोरे, चेतन नेमाडे, अमोल माळी, विशाल राजपुत, पुजा पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content