कोविडच्या प्रतिकारासाठी डॉ. सतीश पाटील यांची मदत

पारोळा प्रतिनिधी । कोविडच्या प्रतिकारासाठी प्रशासनाने केलेल्या लोकसहभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी एक लाख रूपयांची मदत केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने शासकीय साधन-सामग्री तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील कुटीर रूग्णालयात कोविडच्या प्रतिकारासाठी लोकसहभागाचे आवाहन प्रशासनाने केले होते. याआवाहनाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, शेतकरी संघटना, किसान महाविद्यालय, जैन युवक संघटना, महसूल विभाग, व्यापारी महासंघ यांनी प्रतिसाद देत मदत केली. याचसोबत माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनीही एक लाखांची मदत केली.

एका छोटेखानी कार्यक्रमात पारोळा कुटीर रुग्णालयात जनरेटरसाठी डॉ.सतीश पाटील यांनी धनादेश दिला. यावेळी डॉ. सतीश पाटील ,तहसीलदार अनिल गव्हांदे, डॉ.शांताराम पाटील, जि.प.सदस्य रोहन पवार, शिक्षक संघटनेचे अनिल चौधरी, गोरख सूर्यवंशी, डॉ.योगेश साळुंखे, डॉ.मयूर पाटील व किशोर पाटील उपस्थित होते.

डॉ. सतीश पाटील यांनी प्रांताधिकारी विनय गोसावी, डॉ योगेश साळुंखे, अभय पाटील, डॉ.शांताराम पाटील, शिक्षक संघटनेचे अनिल चौधरी, सचिन पाटील, प्रा.प्रदीप आहुजेकर, राज्य आदर्श शिक्षक स.ध.भावसार, जैन युवक संघटनेचे उमेश चोरडिया, केशव क्षत्रिय, शहर तलाठी निशिकांत पाटील, नगरसेवक पी.जी.पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव केला.

Protected Content