श्रीक्षेत्र पाडळसरेत ५ मार्च रोजी “नाटेश्वर महादेवाचा” यात्रोत्सव

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खान्देश गंगा सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी दक्षिण तीरावर “श्रीक्षेत्र पाडळसरे” येथील ग्रामवासीयांचे आराध्य दैवत, पुरातन जागृत देवस्थान व नवसाला पावणारे श्रीनाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव सालाबादा प्रमाणे या वर्षी ही माघ कृष्ण दशमी म्हणजेच मंगळवारी दिनांक ५ मार्च रोजी पाडळसरे ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येणार असून या ठिकाणी पुर्वी पासुन बोकड बळीची प्रथाच नसल्याने महादेवाला गोवऱ्यावर शेकलेली दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य गावातील घराघरातून दाखविण्यात येतो व नवसपूर्ती केली जाते,
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे ‘तमाशा “बंद होता मात्र यावर्षी निर्बंधमुक्त यात्रोत्सव साजरा होणार असल्याने यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाडळसरे ग्रामपंचायत कडून शालीक शांताराम यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत नाटेश्वर शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगां पैकी एक प्रति श्रीनाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व विलोभनीय मंदिराचे काळ्या दगडांनी हेमांड पंथीय कलाविष्काराने बांधकाम करण्यात आले असून कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार उपदिशांना वाघाच्या मूर्त्या व त्यावर कळस आणी भागवत धर्माची पताका व मंदिरात पाषाण शिळा त्यात लिंग हे संगमरवरी आहे. त्रिवेणी संगमस्थळी तापी नदीच्या तीरावर धुळे व जळगाव जिल्ह्य़ाच्या सीमेवर चोपडा शिरपुर व अमळनेर या तीन तालुक्यांचे सीमेचा केंद्रबिंदूवर निसर्गरम्य वातावरणात मंदिर उभारले असून सुर्यमुखी मंदिराचा समोर पश्चिम वाहिनी तापी, दक्षिण वाहिनी अनेर व उत्तर वाहिनी बोरी नदीच्या विलक्षण रमणीय नैसर्गिक परिसरात त्रिवेणी संगमस्थळी नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर स्थापित आहे.

नवसाला पावणारे नाटेश्वर महादेव म्हणून ख्याती असलेले या मंदिराचा जीर्णोद्धार थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिर जीर्णोद्धार समयी केला असल्याची आख्यायिका आहे. यात्रेच्या दिवशी गावातील सर्व जाती धर्मातील कुटुंबीयांकडून महादेवाला गोवऱ्यावर शेकून तयार दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. नवसपुर्तीसाठी येथे भाविक गर्दी करतात. ग्रामवासीयांच्या करमणूकीसाठी पाडळसरे ग्रामपंचायतीने नामा भीमा यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तर खेळणी, पाळने, उपहारगृह आदींसह विविध वस्तूचे दुकाने थाटली जात आहेत.

Protected Content