विवाहितेला कारण नसतांना शिवीगाळ करत मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गौसीया नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करू छळ केल्याप्रकरणी मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गौसीया नगर येथील माहेर असलेल्या सुमैयाबी शेख मुबीन (वय-२२) याचा विवाह अमळनेर येथील मुबीन शेख मुक्ताद यांच्याी रितीरीवाजानुसार झालेला आहे. पती मुबीन हा पत्नी सुमैयाबी यांना काहीही कारण नसतांना वेळोवेळी लहान लहान गोष्टीवरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण केली. सुरूवातीला विवाहितेच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले तरी देखील कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या व मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पती विरोधात पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती मुबीन शेख मुक्ताद याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत महाले करीत आहे.

Protected Content